सरकारचा मोठा निर्णय.!
पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार…
पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांसाठी आता राज्य सरकार सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणार आहे.
तसेच या निवाऱ्याला पोलिसांचं संरक्षणदेखील असणार आहे. याशिवाय एखाद्याला जोडप्याला या निवाऱ्याचा आसरा घ्यायचा असल्यास त्यांना तो माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या असुरक्षित जोडप्यांसाठी सुरक्षेसाठी गृह विभागाने गेल्या महिन्यात मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आता प्रत्येक जिल्हा मुख्यालयात हा सुरक्षा निवारा तयार केला जाणार आहे..