आरोपी लोकसेवक रविकांत भैरू शिंदे, वय ५० वर्षे, पोलीस हेड कॉन्स्टेबल, ब.नं.१६३५, नेमणुक हातकणंगले पोलीस ठाणे जि. कोल्हापूर रा. समीर मोरे यांचे घरी भाडयाने पाच तिकटी, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर मुळ रा. फणसवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांनी लाच मागणी करून स्विकारलेबाबत……..
तक्रारदार यांचे किरणा मालाचे दुकान आहे. हातकणंगले पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार शिंदे हे मागील महिन्यात तसेच दिनांक १५/१०/२०२४ रोजी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना तुमचे दुकानातुन गुटखा पान मसाला विकी केला जातो तुझ्यावर कारवाई करणार, कारवाई नको असेल तर महिना १०,०००/- दयावे लागतील असे म्हणाले त्यावेळी तक्रारदार यांनी काहीतरी कमी करा असे म्हणाले त्यावेळी शिंदे यांनी तडजोड करून तक्रारदार यांचेकडुन प्रत्येक महिन्याचे ४,०००/- रूपये तसेच ते कुंभोज बिटमध्ये येवुन चार महिने झाले असुन चार महिन्याचे मिळुन एकुण १६,०००/- रूपये दयावे लागतील असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे १६,०००/-रू. दयावे लागतील अशी मागणी केली होती. म्हणुन तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तकार दिली होती.
तकारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आलोसे पोलीस हवालदार शिंदे यांनी तक्रारदार यांचे दुकानातुन गुटखा पान मसाला विक्री केला जातो त्यांचेवर कारवाई करणार, कारवाई नको असेल तर महिना १०,०००/- दयावे लागतील असे म्हणुन तडजोड करून तक्रारदार यांचेकडुन प्रत्येक महिन्याचे ४,०००/- रूपये तसेच ते कुंभोज बिटमध्ये येवुन चार महिने झाले असुन चार महिन्याचे मिळुन एकुण १६,०००/- रूपये दयावे लागतील असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे १६,०००/- रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले
त्यानंतर सापळा कारवाई आयोजीत केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडुन रविकांत भैरू शिदि, वय – ५० वर्षे, पोलीस हेड कॉन्स्टेबल, ब.नं. १६३५, नेमणुक हातकणंगले पोलीस ठाणे जि. कोल्हापूर यांनी स्वतःसाठी मागणी केलेप्रमाणे १६,०००/- रूपये स्विकारलेने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन सदर आलोसे यांचेविरूध्द हातकणंगले पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. श्रीमती डॉ. शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री बापु साळुंके पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ. श्री सुनिल घोसाळकर, पो.हे.कॉ. संदिप काशीद, पो. ना. सचिन पाटील, पोकों संदिप पवार, चा.स.फौ. गजानन कुराडे अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.