अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. १८ (प्रतिनिधी) पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल जय हिंद समोर कणेरीवाडी गावच्या हद्दीत स्कार्पिओ मधील आठ लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून जप्त करण्यात आला.
विविध ब्रँडचे ७५० मिलीचे ३५ बॉक्स, १८० मिलीचे १० बॉक्स असे मद्य मिळून आले एकूण मद्यवाहनासह मुद्देमालाची किंमत ७,९७, ६०० असून मद्याची किंमत २,९७,६०० आहे. आरोपी महेश सुदेश बोबाटे व.व .२७ रा. माने गल्ली, दौलतवाडी, तालुका कागल यास अटक करण्यात आली असून एम एच ०४ डी एन ८५५५ नंबरची स्कार्पिओ सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे,दुय्यम निरीक्षक गिरीश करचे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे यांनी केली.
या कारवाईत कांचन सरगर,विलास पोवार,धीरज पांढरे, विशाल भोई, सचिन लोंढे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला.
गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे करत आहेत.