कपिल पाटील यांचा काँग्रेस प्रवेश
(मुंबई राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त)
आज समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे प्रवेश केला.
यावेळेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.
आमदार कपिल पाटील हे गोरेगाव मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत असे सुत्रांनी सांगितले. शिवसेना पक्षातर्फे या मतदारसंघातून समीर देसाई प्रयत्नशील आहेत तर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते युवराज मोहिते उमेदवारीसाठी उत्सुक होते. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही कपिल पाटील यांनी काँग्रेसची वाट पकडली नव्हती व कपिल पाटील यांनी निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक काँग्रेस तोंडघशी पडले आहेत अशी प्रतिक्रिया काहीनी दिली आहे. शिक्षक आमदार असताना कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली होती व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आपल्या पक्षाच्या बोधचिन्हांचे उद्घाटन केले होते. दुर्दैवाने मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूकी मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कपिल पाटील यांना साथ न दिल्याने कपिल पाटील व उध्दव साहेब यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. महाविकास आघाडीतून कपिल पाटील यांची पुढची वाटचाल असेल. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बघू या कपिल पाटील आपला हात कसा मारतात ते.