
वाढत चाललेल्या भरमसाठ महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे घरचे महिन्याचे बजेट पार बिघडून गेले आहे , गॅस सिलेंडर 1000 , रू . पेट्रोल 120 ,रू दूध 72 रू , कडधान्य , कांदा 50 रू किलो , टमाटर 50 रू. किलो लसूण 320 रू. किलो आहेत , इतकी भरमसाठ महागाई असताना त्यात आता सरकारने मुद्रांक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यामुळे मोठा आर्थिक फटका सर्वाँना बसणार आहे. लाडक्या बहिणीला देत असलेले 1500 आता भावाकडून वसूल करून घेण्याचे काम सुरू केले आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हजारो योजना आल्यात. परंतु, एका हाताने हजार द्यायचे अन् दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, असा काही प्रकार आता पाहायला मिळत आहे.
यापूर्वी 100 रुपयांचा स्टँप उपलब्ध होता. पण आता महसूल विभागाकडून केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केले जात आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाचा मदतीचा हात दिला. परंतु, त्याच बहिणीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जात आहेत .
आतापर्यंत नोटरीचा साधा स्टॅम्प 100 रुपयांना मिळत होता. आता तो 500 रुपयांना मिळणार आहे. बहिणीला दिलेले भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियातून व्यक्त केल्या जात आहेत. तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टँप घेतले जात होते. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहेत , म्हणजे एका हाताने हजार द्यायचे अन् दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे म्हणजे आवळा देऊन कवळा काढण्याचा प्रकार आहे .
मेहबूब सर्जेखान ( ज्येष्ट पत्रकार )