दोन लाखाचा मद्य साठा जप्तएक्साईज गडहिंग्लज विभागाची कारवाई

दोन लाखाचा मद्य साठा जप्तएक्साईज गडहिंग्लज विभागाची कारवाई

दोन लाखाचा मद्य साठा जप्त
एक्साईज गडहिंग्लज विभागाची कारवाई

(अमोल कुरणे)

कोल्हापूर, दि.५ (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तालुक्यातील बिर्डी कान्हूर येथील अडकूर ओढ्या शेजारी गोवा राज्याची विदेशी मद्याने भरलेले गोल्डन एस ब्लू फाईन व्हिस्की बॅन्डचे ७५० मिलीचे ३२ बॉक्स मिळुन आले. असुन एकुण मुद्देमालाची किंमत २,११, २०० इतकी आहे. या प्रकरणी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने पावनोजी भिकाजी पाटील, व.व.४६ रा. गवसे, ता. चंदगड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्याच्या इतर साथीदारचा सहभाग आहे का ? तसेच मद्याचा सार्वजनिक विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये कोठे पुरवठा केला जाणार होता याबाबतचा तपास सुरु आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, संदिप जाधव, स्वप्नील पाटील, सहा. दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगुले, भरत सावंत स्वप्नाली बेडगे, वाहनचालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक प्रमोद खरात करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *