शिवाजीनगर चे नामांतर छत्रपती शिवाजीनगर करण्याची शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी -पुण्यातील महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून देण्याचे केले आवाहन

शिवाजीनगर चे नामांतर छत्रपती शिवाजीनगर करण्याची शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी -पुण्यातील महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून देण्याचे केले आवाहन

४ न

शिवाजीनगर चे नामांतर छत्रपती शिवाजीनगर करण्याची शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुण्यातील महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून देण्याचे केले आवाहन

पुणे दि.८: पुणे शहरातील नामांकित असलेला शिवाजीनगर परिसर हा पुणे शहराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक सन्मान होण्यासाठी शिवाजीनगर परिसराचे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच आजपासूनच आपण छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ असा उल्लेख करूयात आणि महाराजांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करूयात, असे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

महायुतीच्या उमेदवारांकरिता आज पुणे शहरातील शिवाजीनगर या भागामध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेला संबंधित करताना शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, पुणे शहर आणि परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत काही टप्प्यातील मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने पुणेकरांचा रोजचा प्रवास सुखकर झालेला आहे. लवकरच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वडार समाजासाठी महामंडळाची निर्मिती केलेली आहे. समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये या दृष्टीने महायुती सरकारने कार्य केलेले आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असा विरोधक अपप्रचार करत आहेत मात्र जानेवारीपासून लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले असून यापुढे देखील लाडकी बहीण योजना ही अखंडपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणेकर नागरिक सुज्ञ आहेत त्यामुळे पुणे शहरातून महायुतीचे सर्व उमेदवार निश्चितपणे बहुमताने निवडून येतील अशी खात्री शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

या सभेला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, हडपसर विधानसभेचे उमेदवार आणि आमदार चेतन तुपे, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगीरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भारतीय जनता पार्टी चे महामंत्री राजेश पांडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे, लहुशक्ती सेनेचे नितीन वायदंडे, रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *