१४ न
पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त संपूर्ण विश्वात बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरू यांचे कार्य म्हणजे शांतता, समता, मानवता आणि स्वातंत्र्यलढा या भोवती गुंतलेलं राहिलं आहे. भारताचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोलाची कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, नवीन वैज्ञानिक दृष्टी देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे. त्यांचे नेतृत्व पक्षीय वादाच्या पलीकडचे राहिले आहे. अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे, अवर सचिव श्री.विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) श्री.सुरेश मोगल, मा.उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अविनाश रणखांब, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.