आमदार यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेत उसळला जनसागर

आमदार यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेत उसळला जनसागर

आमदार यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेत उसळला जनसागर

जयसिंगपूर –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनसंवाद यात्रा जयसिंगपूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडली.
जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण, क्रेनच्या सहाय्याने मोठ्या हारांनी सजावट, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, हलगीचा कडकडाट आणि विजयाचा जयघोष हे या यात्रेचे खास आकर्षण ठरले. जयसिंगपूर शहरातील प्रत्येक चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार यड्रावकर यांचे जोरदार स्वागत केले. महिलांनी औक्षण करून आणि फुलांचा वर्षाव करून त्यांचा सत्कार केला.
आमदार यड्रावकर यांनी जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात केली. यानंतर शहरातील गल्ली नंबर १, गोरोबा कुंभार मंदिर, बेळकुडे कॉर्नर, राजीव गांधी नगर, गल्ली नंबर ९, शहा पेट्रोल पंप, मनीषा ऑटोमोबाईल, हेरवाडे कॉलनी, शाळा नंबर ९, पटेल चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदणी रोड, ईदगाह मैदान, झेले स्कूल आणि क्रांती चौक मार्गे सिद्धेश्वर मंदिर येथे या यात्रेची सांगता झाली.
शहरातील विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या उत्साहात रॅलीचे स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी फुलांची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून आपली पाठिंबा व्यक्त केला. हलगी, आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण शहर जल्लोषमय झाले होते.
ही जनसंवाद यात्रा जयसिंगपूर शहरातील सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन ठरले. रॅलीत शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांचा आणि युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. यात्रेच्या सांगतेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. व केलेल्या शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक विकासकामांचा उल्लेख करताना, गेल्या पाच दशकांत जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा निधी मी आणला आहे. हा विकास पुढे चालू ठेवण्यासाठी जनतेने मला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.
शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी यात्रेत हजेरी लावून यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा दिला. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, युवकांचा जोश, आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद या सर्वांमुळे ही यात्रा यशस्वी ठरली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *