बोलायची भात व बोलायची कढी म्हणजेच महाविकास आघाडी – डॉ.नीलम ताई गोऱ्हे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अशोक पाटील यांना आमदार करणे गरजेचे.. डॉ.नीलम ताई गोऱ्हे.
दि: १७/११/२४ रोजी विधान सभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे भांडुप येथे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.अशोक पाटील यांच्या प्रचार सभेस उपस्थित होत्या.
महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशा नंतर महाविकास आघाडीने देखील आम्ही सरकार आल्यास ३००० रू. देवू असे आश्वासन म्हणजे लबाडा घरचे आमंत्रण तसेच बोलायची भात व बोलायची कढी म्हणजेच महविकास आघाडी असा घणाघात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला.
देश जसा मोदीच्या हातात सुरक्षित आहे तसे आपले राज्य महायुती सरकार आल्या पासून सुरक्षित झाले
देशात मोदींचे सरकार आले व राम मंदिर चा प्रश्न फक्त सुटला नाही तर आज मंदिर देखील उभे राहिले तसेच राज्यात महायुतीचे सरकार आले व कोस्टल मार्ग,अटल सेतू,मेट्रोचे जाळे असे अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले.
छेडा नगर जंक्शन ते ठाणे फ्री वे विस्तार काम प्रगती पथावर,ठाणे – बोरिवली टनेल, गोरेगाव – मुलुंड टनेल काम सुरू झाले तसेच मुंबई मधील टोल मुक्ती असे महत्वाचे निर्णय महायुती सरकारने घेतले त्यांचप्रमाणे आनंदाचा शिधा,वयोश्री योजना,अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयाची वाढ असे अनेक सामान्य माणसाच्या जीवनातील प्रश्न सोडवण्याचा काम महायुती सरकारने केले.
भांडुप येथील घनकचरा व्यवस्थापन चा विषय असो किंवा शासकीय रुग्णालय मंजुरीचा विषय असो यांच्या पाठपुरावा करण्यासाठी अशोक पाटील यांना आमदार करणे आवश्यक असे मत डॉ.नीलम ताई यांनी व्यक्त केले
या सभेमध्ये मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
या सभेस मुख्यमंत्री महोदयांनी दुरध्वनी द्वारे संबोधित केले.
या सभेस नरेश म्हस्के खासदार ठाणे,मनोज कोटक मा.खासदार,मीनाताई कांबळी शिवसेना नेत्या,शशिर शिंदे शिवसेना नेते,शाम सावंत आमदार,दीपक सावंत मा.मंत्री,संध्याताई वढावकर उपनेत्या शिवसेना,राम रेपाळे निरीक्षक, राजश्री मांडवीलकर विभाग प्रमुख व उमेदवार अशोक पाटील उपस्थित होते.