२० नोव्हेंबर २०२४
मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य;जनतेने सुट्टीचा गैरफायदा घेऊ नये – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार बजवावा. लोकशाहीत सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं, असं आवाहन शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. तसेच यावेळी मतदान करण्यासाठी मतदारांची लोकसभेपेक्षा अधिक गर्दी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.