
कोल्हापूर, दि.२६ (प्रतिनिधी) सामाजिक न्याय विभाग विविध संस्थां व परिवर्तन फाउंडेशन तर्फे बिंदू चौक येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि तेव्हापासून २६ नोव्हेंबर हा दिवस देशात ‘संविधान दिवस’ साजरा केला जाऊ लागला. या दिना निमित्त सामाजिक न्याय विभाग, परिवर्तनवादी फाउंडेशन तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, कोल्हापूर दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक, एम.आय.डी.सी. चे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक, ए.एस.आय. तात्यासाहेब कांबळे, परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, भा.ज.प. ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुनिल कुंभार, निवासराव सूर्यवंशी, विद्याधर कांबळे, सुरेश हातकलंगलेकर , प्रा. आंनद भोजने, निवृत्त कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, बार्टी चे अधिकारी, समता दूत किरण चौगुले, आशा रावण, लोक जनशक्तीचे बाळासाहेब भोसले, तकदीर कांबळे, दावीद भोरे, बंडा अवघडे, बाळासाहेब साळवी आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.