नेहरु युवा केंद्रामार्फत संविधान दिन साजरा
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरु युवा केंद्र व मेरा युवा भारत आणि श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी अमृत महोत्सवी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम संविधान उद्देशिकेचे पूजन व सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे स्पर्धा तसेच संविधान जनजागृती पथनाट्य व पदयात्रा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना भेटवस्तू व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी 5 डिसेंबर पर्यंत MY BHARAT पोर्टलवर प्रश्नमंजुषा ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी जिल्हा युवा आधिकारी मिस पूजा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जी.जी. चौगले, IQAC समन्वयक जे.के चव्हाण, डॉ. संतोष मधाळे, राजेश मेश्राम, निलेश कांबळे, गौरव पाटील, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.