मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबतच्या वाढत्या तक्रारी व त्यांचे निवारण ही एक गंभीर बाब आहे याबाबतचे सूचना पत्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रधान सचिव गृह विभाग यांना दिले आहे.
NCRB डेटा दर्शवितो की, महिलांची व लहान मुलांची सुरक्षा हे एक आव्हान आहे. या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवणे, नवीन कल शोधणे आणि कायद्याची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे.
त्यामुळे वरील घटना आणि होणारे इतर गुन्हे यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत या कार्यालयास अवगत करावी अशी सूचना देखील डॉ.गोर्हे यांनी केली आहे.