महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त विविध परिवर्तनवादी संस्था तर्फे अभिवादन
कोल्हापूर, दि.२८ (प्रतिनिधी)
स्त्रिया, दलित, कष्टकरी समाजाला धार्मिक, सामाजिक गुलामगिरीतून बंधमुक्त करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले असे मनोगत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी विविध परिवर्तनवादी संस्था तर्फे आयोजित बिंदू चौकातील कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समतेवर आधारित, शोषण विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले तसेच स्त्रियांना शिक्षित करून त्यांना आत्मभान दिले असे ॲड. धनंजय पठाडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी ए.एस.आय.तात्यासाहेब कांबळे, परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, निवास सूर्यवंशी, पेत्रस सोरटे, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, तकदीर कांबळे,लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी, सतीश रास्ते, तारा डाके, बबन रानगे, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, ॲड. विश्वनाथ कांबळे, प्रशांत अवघडे आदी उपस्थित होते.