मद्य वाहनासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल फेजिवडेत जप्त ; राज्य उत्पादन शुल्क कागल पथकाची देवगड-निपाणी महामार्गावर कारवाई

मद्य वाहनासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल फेजिवडेत जप्त ; राज्य उत्पादन शुल्क कागल पथकाची देवगड-निपाणी महामार्गावर कारवाई

मद्य वाहनासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल फेजिवडेत जप्त

राज्य उत्पादन शुल्क कागल पथकाची देवगड-निपाणी महामार्गावर कारवाई

अमोल कुरणे

कोल्हापूर, दि.१२ (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर व २०२५ च्या नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क कागल विभागास देवगड-निपाणी राज्य महामार्गावर गोवा राज्य निर्मित मद्य तस्करी करणारा भरधाव वेगाने धावणारा टेंम्पो फेजिवडे ता.राधानगरी जि. कोल्हापूर या गावच्या हद्दीत फोंडा-राधानगरी रोडवर ताब्यात घेतला. टॅम्पो चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
टाटा आईस गोल्ड नं. एम.एच. ०९ ई एम ४७०५ टॅम्पोची तपासणी केली असता मद्यसाठा डॉक्टर ब्रॅन्डी १८० मिलीच्या १४४ बाटल्या, रॉयल चॅलेंजर व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या, ब्ल्यू ओशेन बडर्स बेव्हअरिज व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, डिएसपी ब्लॅक ७५० मिलीच्या १२ बाटल्या, डिएसपी ब्लॅक १८० मिलीच्या १४४ बाटल्या, मॅकडोल नंबर १ ओरीजनल व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २४० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मिलीच्या ४८ बाटल्या असा विदेशी मद्य साठा एकुण २२ बॉक्स (१९० ब.लि.) असे २ लाख ९७६ चे मद्य व साडेतीन लाखाचा टॅम्पो असा पाच लाख ५० हजार ९७६ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी मद्य तस्करांचा शोध घेतला असता वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मद्य तस्कर बाबू तांबे रा.फोंडा ता.कणकवली जि.सिंधुदूर्ग याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (A), (B) 81 आणि 83 अन्वये सीआर नं.242/2024 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय उप आयुक्त विजय चिचांळकर, एक्साईज अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल एक्साईज निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक आर डी चंदुरे, जवान सचिन काळेल, डी बी गवळी , केतन दराडे यांनी केली. या कारवाईत राधानगरी पोलीस स्टेशनचे सहकार्य मिळाले
गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क कागल विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आंबेरकर करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *