परभणी येथील संविधान प्रति प्रतिकृती विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन. , सेवली पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेडकरी समाजावरील दडपशाही थांवबा – दिपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष ,

परभणी येथील संविधान प्रति प्रतिकृती विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन. , सेवली पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेडकरी समाजावरील दडपशाही थांवबा – दिपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष ,
विलास मस्के : उप संपादक संघर्षनायक मीडिया
जालना: तालुक्यातील सेवली येथे दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी सेवली पोलिस निरीक्षक श्री. खटकळ यांना परभणी येथील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां माथेफिरूवर कठोर कारवाई करावी व यामध्ये असलेल्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.तसेच याप्रकरणी निषेध आंदोलन करणाऱ्या भीम सैनिकावर गुन्हे दाखल करण्यात आले ते ताबडतोब मागे घेण्यात यावे. दलित वस्त्यांमध्ये चालु असलेले अटकसत्र थांबवावे यासह विविध मागण्या पुढील प्रमाणे मौजे.बोरगांव ता,जि.जालना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना होऊन वर्ष उलटले आहे तरी अद्याप कोणतही आरोपी अटक नाही तात्काळ याप्रकरणी दोषी आरोपींना अटक करून कार्यवाही करण्यात यावी व याप्रकरणाचा तपास जालना स्थानिक गुन्हे शाखे कडे देण्यात यावा. मौजे अंभोरा जहांगीर येथील आंबेडकरी जनतेला पोलिसा मार्फत विनाकारण त्रास दिला जात आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा.मौजे बोरगांव येथील साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पोलिसां मार्फत मातंग समाजातील सामाजिक ध्वज काढण्यात आला आहे तो पुर्ववत करण्यात यावा.एरंडे वडगांव प्रकरणात 29 आंबेडकरी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,भगवान मघाडे,लखन वाहुळकर,प्रल्हाद पालवे, मुकुंद काळे,दिलीप मगर, किरण रनशूर अनिल खाडे,दत्ता खाडे, शहाजी खाडे, दत्ता काकडे,करणं काळे,रोषन सदावर्ते,पवन बनकर,शरद काळे,सतिश जोरावाल, विशाल सदावर्ते, एकनाथ खाडे, सिध्दार्थ काळबाग,आत्तम खाडे, गणेश वाहुळे,शरद सिताराम काळे, बाबासाहेब काळे, मच्छिंद्र काळे, निलेश खाडे, राहुल सदावर्ते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *