नवे दानवाड ता.शिरोळ येथे तालुका विधी सेवा समिती कुरुंदवाड तर्फे फिरते लोकन्यायालयाचे व कायदेबाबत जनजागृतीचे कार्यक्रम अतिशय उस्फुर्तरित्या संपन्न झाले.

कुरुंदवाड कोर्टाचे मे. दिवाणी न्यायाधीशसो आद.श्री. बाळासाहेब गायकवाड साहेब, कुरुंदवाड कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कांबळे साहेब व गावाचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी.डी.पाटील यांच्या शुभ हस्ते लोकन्यायालयाचे मोबाईल व्हॅनचे उद्धगाटन करण्यात आले.
त्यानंतर शिबिरास राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत अंमलात असेल असे विविध योजने बाबत कुरुंदवाड कोर्टाचे न्यायाधीशसो आद. बाळासाहेब गायकवाड साहेब, वाहातून नियंत्रण या विषयावर कुरुंदवाडचे पोलीस सहनिरीक्षक श्री.रविराज फडणीस साहेब, मानवी हक्क या विषयावर ॲड. यू.पी.पाटील साहेब, बेटी बचाव बेटी पठाव या विषयावर ॲड.व्ही.एल.जमदंगी साहेब, पॉक्सो कायदेची माहिती ॲड.जी.एस. कुलकर्णी साहेब असे उपस्थित नागरिकांना कायदे विषयी मार्गदर्शन केले तर आभार हे गावातील ॲड.राहुलराज कांबळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सरकारी वकील कविता परीट साहेब, कुरुंदवाड बारचे उपाध्यक्ष ॲड.पी.बी.आवटी,कुरुंदवाड कोर्टाचे ॲड. आर.जी.गौरवाडे, ॲड. एन.बी. बागवान, ॲड. एस.डी.पाटील, ॲड. आय. जे. चोरे, ॲड. आय.जे धलाईत, गावाचे पोलीस पाटील स्वाती कुनुरे, आरोग्य उपकेंद्रचे CHO डॉ.अनीसा नदाफ, ग्रामसेवक सरिता मोठे सह तसेच सर्व ग्रा. पं.सदस्य-सदस्या, आजी माजी पदाधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
अशा या “न्याय आपल्या दारी” या कार्यक्रमामुळे प्रथमच मे. कोर्ट गावात आले कारणाने नागरिकांच्यात आनंदचा वातावरण निर्माण झालेले आहे.