डोंबिवली येथे संविधान अवमनाच्या निषेधार्थ आरपीआय (A) चे भव्य निदर्शने

डोंबिवली येथे संविधान अवमनाच्या निषेधार्थ आरपीआय (A) चे भव्य निदर्शने

डोंबिवली येथे संविधान अवमनाच्या निषेधार्थ आरपीआय (A) चे भव्य निदर्शने

डोंबिवली-
परभणी येथील संविधान अवमानाच्या निषेधार्थ व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊं निकळजे यांच्या आदेशाने आरपीआय (A) कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव ,कल्याण डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आरपीआय- ए डोंबिवली शहर युवक अध्यक्ष सुमित कनकुटे यांचे नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, डोंबिवली पूर्व येथे भव्य निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, पोलिसांच्या कोंबडींग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्याना तातडीची आर्थिक मदत द्यावी ,पोलिसांनी केलेल्या कोंबिन कारवाईत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घराच्या नुकसान भरपाई द्याव्या, जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करावेत, न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावे ,सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी, पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग ,सहाय्यक आयुक्त कल्याण विभाग व तहसीलदार कल्याण तालुका यांना देण्यात आले सदर आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे कल्याण डोंबिवली युवक जिल्हा उपाध्यक्ष अनवर शेख, ठाणे प्रदेश कामगार आघाडी सचिव कुशल निकाळे, नरेश गायकवाड, अक्षय गायकवाड, राजेश चंदनशिवे, टिटवाळा शहराध्यक्ष पंकज जाधव, सामाजिक कार्यकर्ते दीपक भालेराव ,सचिन कनकुटे, आझाद समाज पार्टी, शिवगर्जना भाजी व फळ विक्रेता संघ, कष्टकरी होकर्स युनियन ,नाका कामगार संघटना ,रिक्षा चालक मालक संघटनांचे कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आंदोलनात रिपब्लिक सेनेचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे, राहुल नवसागरे, सुभाष शिरसाट, अजित बनसोडे, रमेश ढगे यांनीही आरपीआयच्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *