सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चितेचे निखारे विझण्यापूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे दलित पॅंथर
सोमनाथ सूर्यवंशी ह्या एलएलबी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा परभणी पोलिसांनी बळी घेतला आहे. संविधानाची मोडतोड केल्याप्रसंगी परभणी येथे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल याबद्दल सोमनाथ सूर्यवंशी ह्या विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या मारहाणी मध्ये मृत्यू झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या चित्तीचे निखारे विजण्याआधी पोलिसांच्या वर कारवाई करण्याची मागणी प्रांत अधिकारी सौ. मोसमी बेर्डे यांना निवेदन देऊन दलित पॅंथरने कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर दलित पॅंथर राज्य सरचिटणीस प्रा अशोक कांबळे, अब्दुल गफूर शेख, अविनाश कांबळे, अपेक्षा कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुभाष भंडारकवटे, मोहन नाईक, पद्मा जाधव, शहा नवाज नायकवडे, बरकत आलासे, मयोदीन शेख, सतीश राजमाने ज्योती भास्कर, सोमनाथ पांडव, संतोष कोठावळे, मनोज भास्कर इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत.
Posted inकोल्हापूर
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चितेचे निखारे विझण्यापूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे दलित पॅंथर
