परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पॅंथर आर्मीचे आंदोलन

परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पॅंथर आर्मीचे आंदोलन

परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पॅंथर आर्मीचे आंदोलन

इचलकरंजी :
परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावीत या प्रमुख मागणी साठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले .

दिनांक 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना
दत्ता सोपान पवार वय वर्ष 42 राहणार मिर्जापुर ता जि परभणी या माथेफिरू इसमाने केल्याची घटना घडली आहे .
स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे .भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृती आहे देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत . संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरू ला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा . परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावीत .
अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयांची तात्काळ सुटका करावी . अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे
शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्याचे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकरण देण्यात आली. यावेळी सचिन माने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पॅंथर आर्मी , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युसुफभाई तासगावे, इम्राण सनदी जिल्हाअध्यक्ष एमआयएम , हुसेन मुजावर , समिर विजापुरे , मुकेश घाटगे , रवि कांबळे , जावेद खान , राम कांबळे ,स्वप्निल बनसोडे , विशाल कांबळे अबूबकर आलासे,दिलावर मुल्ला, सलमान नाईकवाडे,रज्जाक शिरगूर, सद्दाम शेख,मलिक मुजावर,हाफिज सिराज नदाफ,अशपाक डांगे,गौस मुल्ला आदि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *