कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखलपोलीस आयुक्त, आशुतोष ठोंबरे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा व निर्देशांचा स्विकार

कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखलपोलीस आयुक्त, आशुतोष ठोंबरे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा व निर्देशांचा स्विकार

कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल
पोलीस आयुक्त, आशुतोष ठोंबरे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा व निर्देशांचा स्विकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याआधी तिचे अपहरण करण्यात आले होते. ही घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.

२३ डिसेंबरच्या संध्याकाळी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. यामध्ये ठाणे ग्रामीण पडघा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर क्र ११९०/२०२४ दिनांक २३/१२/२०२४ नोंदविण्यात आला. २४ डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला.

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. माहितीनुसार, यामध्ये आरोपीला त्याच्या पत्नीची साथ दिल्याचे समजते. या प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे विशेष सूचना दिल्या आहेत. आरोपींना जामीन मिळणार नाही व कठोर शिक्षा होईल यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, सरकारच्यावतीने निष्णात अभियोक्त्यांची नियुक्त करावी.

सीसीटीव्ही व पुरावे तपासून घ्यावेत. बाधित कुटुंबास तत्काळ मदत करून समुपदेशन करावे. त्याचबरोबर लहान मुलींचे अपहरण, अत्याचार रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावा. अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *