सावित्रीबाई जयंती निमित्त विद्यार्थ्यिंनी
केले विशेष वंदन कार्यक्रम.
सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या.
सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मिळून दलित, मुस्लीम स्त्रिया आणि बालके यांना वर्ग, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. या योगदानासाठी फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका बनल्या. १८४८ मध्ये मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक सह-स्थापना केली.
जाती आणि लिंगावर आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक रद्द करण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतीराव फुले भारतीय स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते.
सावित्रीबाई जयंती म्हणजे नववर्षाचा पहिला सण. अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेत नववर्षाच्या प्रारंभी सावित्रीबाई जयंती एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आज समाजात स्त्री सन्मानाने जगता आहे, डाँक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, अधिकारी जगातील कोणत्याही क्षैत्रात उल्लेखनीय कार्य करणारी स्त्री म्हणजे नारी शक्ती आहे असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले. स्काऊटचे सहआयुक्त श्री. जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई जयंतीनिमित्त समयोचित व्याख्यान आयोजित केले.