पुणे : भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण व मालकी हक्क हा प्रशासकीय आणि न्यायालयीन लढा दिवाणी न्यायालय (पुणे) व मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे परंतु या लढ्याची अनेकांना माहिती नाही. भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते याची सुध्दा माहिती नाही. या लढ्याची माहिती व्हावी म्हणून जनजागृती अभियान राबवून हा लढा समजभिमुख व लोकलढा व्हावा असे वाटते. या न्यायालयीन आणि प्रशासकीय लढ्यात आम्हाला सोबत घ्या..आम्हाला पण काम करायचे आहे अशी अनेक धम्म बंधू व भगिनींनी फोन व सोशल मीडियाद्वारे अनेक दिवसांपासून मागणी केली होती. अनेकांच्या सूचना आल्या आणि म्हणून या जनजागृतीच्या माध्यमातून समाजभिमुख व जन लढा व्हावा यासाठी शौर्य दिनाच्या दिवशी म्हणजे १जानेवारी २०२५ रोजी भीमा कोरेगाव येथे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून ज्यांना वाटतं की हा जयस्तंभ वाचवा त्यांनी या समितीत सहभागी व्हावे. या समितीत सामील होत असताना ते संविधानवादी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे असले पाहिजे. प्रत्येकाच्या राजकीय भुमिका त्यांच्या जवळ राहतील या समितीत फक्त जयस्तंभ वाचवणे हाच प्रामुख्याने उद्देश असेल. कुठल्याही राजकीय पक्षांवर व नेत्यांवर टीका करता येणार नाही. राजकीय,धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक व इतर क्षेत्रातील ज्यांना या समितीत काम करायचे त्यांचे स्वागत करण्यात येईल.. एकमेकांविषयी असलेले मतभेद, द्वेष, वाद बाजूला ठेवून आपण सर्व एक होऊन आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतिक वाचवूया….ज्यांना या समितीत सामील व्हावे असे वाटत असेल त्यांनी आपलं नाव, तालुका, जिल्हा व शहर अशी आपली माहिती 9702845000 या whats app नंबर वर पाठववी. आपण या लढ्यात सामील व्हा अशी मी आपल्याला विनम्रता पूर्ण विनंती करतो…
जय भीम
Posted inपुणे
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती मध्ये सहभागी होण्याचे दादाभाऊ अभंग यांचे आवाहन
