महाराष्ट्रातील 54 लाख बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टल पूर्णपणे सुरू न झाल्यास 21 जानेवारीपासून मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील हजारो बांधकाम कामगारांचे बेमुदत उपोषण होणार.

महाराष्ट्रातील 54 लाख बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टल पूर्णपणे सुरू न झाल्यास 21 जानेवारीपासून मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील हजारो बांधकाम कामगारांचे बेमुदत उपोषण होणार.

महाराष्ट्रातील 54 लाख बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टल पूर्णपणे सुरू न झाल्यास 21 जानेवारीपासून मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील हजारो बांधकाम कामगारांचे बेमुदत उपोषण होणार.
सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 28 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. इतकेच नव्हे तर 26 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. म्हणजेच एकूण 54 लाख बांधकाम कामगारांचे काम सध्या पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे.
या मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी कारस्थान करून आचारसंहिता सुरू आहे म्हणून काम करता येणार नाही असे सांगून सर्व कामकाज बंद पाडले. याची काही आवश्यकता नव्हती म्हणून मुंबई उच्च न्यायालया मध्ये या निर्णयाविरुद्ध कामगार संघटनांनी केस दाखल केली होती.
याबाबत सहा नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश केलेला आहे की एका दिवसात पूर्वी असलेले सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीचे सुरू करण्यात यावे.
परंतु जाणीवपूर्वक बड्या कंत्राटदारांचे भरे करण्यासाठी लाखो कामगारांना सगळ्या लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी या मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी तालुका पातळीवर ऑनलाईन चे काम करण्यात येईल असे घोषित करून प्रत्यक्षामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही.
या अन्यायाविरुद्ध नागपूर विधानसभेवर 18 डिसेंबर रोजी बांधकाम कामगारांनी प्रचंड मोर्चा काढला त्यानंतर दोन जानेवारी रोजी कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांच्याशी चर्चा होऊन त्यांनी बांधकाम कामगारांचे पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
पण प्रत्यक्षात पोर्टल सुरू न झाल्याने कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांच्याशी 9 जानेवारी रोजी फोनवरून संपर्क साधला त्यावेळेस कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी कॉ शंकर पुजारी यांना सांगितले की पोर्टल पूर्वत सुरू करण्यासाठी सॉफ्टवेअरचे कामकाज सुरू आहे लवकरच पोर्टल सुरू होईल.
दरम्यान तालुका कामगार सेवा केंद्रे पूर्ण कुचकामी ठरली असून त्या ठिकाणी कामगारांचे शोषण चालू आहे.
म्हणूनच 21 जानेवारीपर्यंत जर पोर्टल सुरू झाले नाही तर खालील कामगार आणि त्यांच्या साथीला हजारो कामगार बेमुदत उपोषण करणार आहेत. मुंबई
आझाद मैदान मध्ये उपोषणास बसणारे प्रमुख कार्यकर्त्यांची नावे खालील प्रमाणे
नागेश बनसोडे सोलापूर
सागर कुंभार सातारा
मंगेश माटे भंडारा
सुनील लाखे नाशिक
शंकर मधुकर गौळणी
अहमदनगर*
वाहिद पठाण औरंगाबाद

  • संदीप भंडारे अकोला
    अजय कांबळे लातूर
    नितीन यादव सातारा
    वरील सर्वांचे कृती समितीच्या वतीने जोरदार स्वागत करीत आहोत
    आझाद मैदान मुंबई येथे 21 तारखेपासून होणारे बेमुदत उपोषण यशस्वी होण्यासाठीच आतापासूनच सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा करावी असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी निमंत्रक, साथी सागर तायडे सह निमंत्रक व साथी विनिता बाळेकुंदरी यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *