अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा हा सर्व श्रमिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सांगली निवारा भवन येथे असंघटित उद्योगातील श्रमिकांचा भव्य मेळावा संपन्न.
. मुंबई श्रमिकांचे व WPC चे नेते श्री राजू भिसे यांनी भाषणाच्या सुरुवातीस सांगितले की या देशातील असंघटित उद्योगातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना संघटित करून संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा सांगलीमध्ये 11 तारखेस येणार असून ती पुढे नवी दिल्लीकडे निघणार आहे. तरी या महत्त्वपूर्ण सन्मान यात्रेमध्ये सर्व श्रमिकांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले.
मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि WPC नेत्या स्वेता दामले यांनी बोलताना सांगितले की, अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा किमान १२ राज्यांमधून प्रवास करत आहे, भारतातील असंघटित कामगारांचा सामूहिक आवाज उभा करण्यासाठी. वर्किंग पीपल्स कोअॅलिशन (WPC) द्वारा आयोजित, हा विलक्षण प्रवास देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या, पण कमी वेतन, असुरक्षित परिस्थिती आणि दुर्लक्ष झालेल्या लाखो कामगारांसाठी बदल घडवून आणण्याचा उद्देश आहे.
वर्किंग पीपल्स कोअॅलिशन (WPC) ही भारतातील असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे स्वतंत्र, पक्षपाती नसलेले नेटवर्क आहे
ही यात्रा का?
असंघटित कामगार—रस्त्यावरील विक्रेते, घरगुती मदतनीस, प्लॅटफॉर्म (गिग) कामगार, बांधकाम मजूर, घरून काम करणारे कामगार, लैंगिक कामगार, मच्छीमार, योजना आणि आरोग्यसेवा कामगार, जंगल कामगार, कृषी मजूर, वस्त्र कामगार आणि अशा असंख्य इतर—भारतातील एकूण कामगार शक्तीच्या ९०% पेक्षा जास्त आहेत. ते देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत आणि त्यांच्या परिश्रमातून देशाची संपत्ती वाढत आहे. तरीसुद्धा, त्यांना अत्यंत कमी वेतन, असुरक्षित कामाची परिस्थिती, नोकरीची कोणतीही सुरक्षा नाही, मर्यादित किंवा नसलेले सामाजिक संरक्षण, तसेच सन्मान, मानवी हक्क यांची कमतरता भासते.
यानंतर बोलताना ज्येष्ठ कामगार नेते कॉमेडी शंकर पुजारी यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार अशा गटप्रवर्तक सफाई काम इत्यादी व संघटित उद्योगातील कामगार आणि अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा जास्तीत जास्त संख्येने जमून यशस्वी करावे असे त्यांनी आवाहन केले.
यानंतर अशा संघटनेचे नेत्या सुमन पुजारी यांनी सांगितले की अखिल भारतीय सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी तयारीची बैठक सर्व संघटनांची मिळून 17 जानेवारी रोजी सांगली निवारा भवन येथे होईल त्यासाठी सर्व श्रमिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असेही आवाहन त्यांनी केले.
. शेवटी विशाल बडवे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष बेलदार, सलीम इनामदार, शाबिदा शेरकर, राजेंद्र बनसोडे, मोहन जावीर व पांडुरंग बंडगे इत्यादीनी सहभाग घेतला
Posted inसांगली
अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा हा सर्व श्रमिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सांगली निवारा भवन येथे असंघटित उद्योगातील श्रमिकांचा भव्य मेळावा संपन्न.
