: आ सांगली येथे हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या समोर बोलताना भाजपचे आमदार आरक्षित जागेवर निवडून येऊन आमदार सुरेश खाडे यांनी आपल्याच निवडून आलेल्या मतदार संघाला मिनी पाकिस्तान असा उल्लेख करून आपल्याच मतदारसंघाचा व मतदारांना पाकिस्तानी ठरविण्याचे काम आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे. आमदार सुरेश खाडे हे मिरज अनुसूचित जाती मतदारसंघातून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याच मतदारसंघाच्या मतदारांमुळे मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदारांनी दिली. त्याचे उपकार अशा पद्धतीने फेडण्याचे काम आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे .हा मतदारसंघ मिनी पाकिस्तान आहे तर तुम्ही राजीनामा द्यावा व पाकिस्तानात जाऊन किंवा अन्य ठिकाणी कुठेही जाऊन निवडणूक लढवावी. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न आहे. की महाराष्ट्रातील मिरज विधानसभा मतदारांना किंवा मतदार संघाला पाकिस्तानाशी जोडणे योग्य आहे का? हे जाहीर करावे तसेच मतदार संघातील व आरक्षित जागेतून निवडून आलेल्या त्या मतदारांचा अपमान केला म्हणून सुरेश खाडे यांनी जनतेची माफी मागावी व राजीनामा द्यावा नाहीतर मिरज विधानसभा मतदार संघ मिनी पाकिस्तान कसे आहे सिद्ध करावे.
Posted inकोल्हापूर
आरक्षित जागेतून निवडणून आलेले त्या मतदार संघाला मिनी पाकिस्तान ठरवलेले आमदार सुरेश खाडे यांनी राजीनामा द्यावा – सतिश कुरणे
