अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध – पँथर आर्मी

अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध – पँथर आर्मी

*अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध – पँथर आर्मी

मुंबई दि.27 – पंजाब मधील अमृसर येथील सुवर्णमंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे तीव्र निषेध करीत असून या पुतळा विटंबनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी पँथर आर्मी संस्थापक अध्यक्ष संतोष एस . आठवले यांनी केली आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृतसर मधील पुतळा विटंबनेचा प्रकार अत्यंत दुःखद संतापजनक असून या विटंबनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पँथर आर्मी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करावे असे आवाहन संतोष एस . आठवले यांनी केले आहे.

अमृतसर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेच्या निषेधार्ह घटनेस पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार जबाबदार आहे.राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे; महापुरुषांच्या पुतळ्यांचे रक्षण करणे ही राज्य सरकार ची जबाबदारी आहे.त्यात भगवंत मान अपयशी ठरले आहेत. पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.या पुतळा विटंबना प्रकरणा मागे कुणाचा हात आहे कुणाचा कुटील डाव आहे कोण सुत्रधार आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने केली आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *