राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांची आजही देशाला जरुरी – ॲड. धनंजय पठाडे
कोल्हापूर,दि. ३० (प्रतिनिधी) देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकत्रित आणून महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. आजही त्यांच्या विचाराची देशाला जरूरी आहे असे मनोगत ॲड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील पापाची तिकटी येथे आयोजित महात्मा गांधी पुण्यतिथी प्रसंगी ते बोलत होते.
पश्चिम महाराष्ट्रातील महात्मा गांधीजींचा पहिला पुतळा पापाची तिकटी येथे २६ जानेवारी १९५१ रोजी महात्मा गांधी प्रतिमा स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात आला होता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. चित्रतपस्वी व्ही शांताराम यांच्या आर्थिक मदतीने व लोकवर्गणीतून या पुतळ्याची ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी उभारणी केली होती.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय पठाडे व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी.एस.पी. स्नेहलता श्रीकर – नरवणे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी एक्साईज चे इन्स्पेक्टर समीर पाटील, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे, खंडोबा तालमीचे माजी अध्यक्ष शेखर पवार, फिरोजभाई सतारमेकर, चंद्रकांत दिंडे, सकल मराठाचे संजय साळोखे, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, राज कुरणे, निवास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.