माणुसकी फौंडेशनचे रमेश कांबळे यांना उत्कृष्ट “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित
माणकापूर
माणुसकी फौंडेशन महाराष्ट्र राज्य अकिवाट शाखा संस्थापक अध्यक्ष व वंचीत आघाडीचे कार्यकर्ते रमेश कांबळे यांनी आपल्या माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांना सोबत घेऊन अकिवाट व पंचक्रोशीत महापूर व कोरोणा वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी गावोगावी जाऊन जेवणाचे पाकीट पुरवीणे, स्वच्छता अभियान राबवून माणुसकी जपली आहे.कर्नाटक राज्यातील निपाणी तालुक्यातील माणकापूर येथील निसर्गराजा ग्रुप या संस्थेने रमेश कांबळे यांच्या समाजकार्याची दखल घेऊन “समाजरत्न पुरस्कार” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला.सदरचा पुरस्कार हा माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, मध्यप्रदेशचे बॉलिवूड अभिनेता -अजमत मिर्झा, कलाकार -शैलेंद्र होळकर, छत्रपती संभाजीनगरचे विजय मानवतकर, गजानन सातपुते,माजी सैनिक -अशोक मोहीते,कवियित्री-,श्लेशा कांरडे या मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष -शिवाजी येडवान, बसव क्रांती न्युज चे संपादक रमेशकुमार मिठारे,कवी-साताप्पा सुतार व परिसरातील पुरस्कारकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.रमेश कांबळे यांना पुरस्कार मिळाले बद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.सदरचा पुरस्कार सोहळा हा निपाणी तालुक्यातील माणकापूर येथील मलकारसिद्ध मंदिरात पारपडला.