ड

जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदुम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला ‘ नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन’ (NBA) नवी दिल्ली कडून अभियांत्रिकी शाखांसाठी मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या चतुर्मुखी वाटचालीची पुष्टी करते आहे अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईसचेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी दिली.
२०२२ला नॅक कडून’ए’ ग्रेड मान्यता, २०२३ ला युजीसी ‘स्वायत्तता’ (Autonomy) २०२२ व २०२५ सलग दोन वेळेस शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक तपासणीत’ A+ ग्रेड’ आणि २०२५ ला NBA मानांकन. गेल्या ४ वर्षातील ह्या सर्व बाबतीत महाविद्यालयाने गरुड भरारी घेतली आहे . NBA मुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लोबल मानांकनाची पूर्तता महाविद्यालयाने पूर्ण केली आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन समितीने महाविद्यालयास मूल्यांकनासाठी दिनांक २८ फेब्रुवारी,१ व २ मार्च २०२५ रोजी भेट दिली होती.सात सदस्याच्या कमिटीने भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण, महाविद्यालयीन सोयी सुविधा, विद्यार्थी फॅकल्टी व स्टाफ यांचा प्रतिसाद, माजी विद्यार्थी, पालक यांची भेट, विद्यार्थ्यांना अद्यावत स्थितीत पुरवल्या जाणाऱ्या सेवा, विद्यार्थ्यासाठी राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संशोधन प्रकल्प व पेटंट या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करून महाविद्यालयास तीन वर्षासाठी एन. बी.ए.मानांकन बहाल करण्यात आले आहे.
नॅक, ऍटोनॉमी व आता एन.बी. ए. मानांकन ही आमच्या गुणवत्ता, नाविन्यपूर्ण शिक्षण ध्येयांची साक्ष आहे असे उदगार संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ.विजयराज मगदूम यांनी काढले.
स्वायतता मिळाल्यापासून आमच्या संशोधन आणि उद्योग-योग्य अभ्यासक्रमांना गती मिळाली आहे. NBA मानांकन यामध्ये अधिक भर घालते असे मत ॲडव्होकेट डॉ.सोनाली मगदूम (उपाध्यक्ष) यांनी व्यक्त केले आहे.
२०२१ पासूनच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी शिक्षक आणि ट्रस्टचे एकत्रित प्रयत्न दिसतात. आम्ही विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील अडमुठे यांनी सांगितले.
एन.बी.ए. मानांकन हे फक्त मानांकन नाही तर नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असे मत प्राचार्या डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या यशाबद्दल चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी कॅम्पस डायरेक्टर, प्राचार्य, एन.बी.ए. कोऑर्डिनेटर डॉ. शुभांगी पाटील सर्व शिक्षक, स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचेहि अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.