आक्काताई नेजे हायस्कूल दत्तवाड 1992 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

आक्काताई नेजे हायस्कूल दत्तवाड 1992 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

आक्काताई नेजे हायस्कूल दत्तवाड 1992 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दत्तवाड : श्रीमती आक्काताई नेजे हायस्कुल ता शिरोळ येथील सन 1991 – 92 या वर्षाच्या दहावी बॅचच्या माजी विध्यार्थी विद्यार्थीनी चा स्नेह मेळावा डी ए जुगळे सर ,अर बी सूर्यवंशी सर, ए बी नेजे सर, कलाशिक्षक एम सी पुजारी सर, बर्गाले मॅडम, ए बी पाटील सर आदी गुरु जनांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न झाला .
सुरवातीस सर्व गुरुजन व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पवर्ष्टी करून हलगीच्या वाद्यात शाळेच्या गेट पासून विचारपिठा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली . त्यांनतर माजी विद्यार्थीनींनी गुरुजनांने पादय पुजन केले . पहलगाम हल्यात मुत्यमुखी पडलेल्या नागरीकांना व शाळेतील मृत्यु पावलेले शिक्षक , माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपाला परिचय व मनोगत व्यक्त केले . यावेळी जुगळे सर व पुजारी सर यांनी सर्व माजी विद्यार्थीना मागदर्शन केले . तर सचिन मटपती , सुजाता अंबुपे यांनी विशेष मनोगत व्यक्त केले .
स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रात केले होते . सकाळ चा नाष्ता दुपारी स्नेह भोजन व सांयकाळी चहा बिस्किट यांचे छान आयोजन केले होते . दुपारच्या सत्रात मनधना मॅडम यांचा उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रमांने सर्व विद्यार्थ्यांना बाल वयात घेवून गेल्या . सर्व माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊन भरभरून आनंद घेतला .
स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर कलगी .
बसगोंडा पाटील , देवेंद्र चौगुले, शंकर कुंभार , राजू पाटील , युनुस कुरणे सचिन सिदनाळे . सुदर्शन पाटील, पुष्पा मगदूम , मेघना उपाध्ये , बाहुबली कमते, बाहुबली नेजे , श्रीकांत माने यांनी विशेष परिश्रम घेतले .
स्वागत महेश पाटील यांनी तर प्रास्ताविक बसगोडा पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रशेखर कलगी यांनी केले व आभार राजमती सवळे यांनी मानले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *