अर्जुन कांबळे यांचा वाढदिवस प्रेरणादायी कार्याचा प्रवास
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील ज्येष्ठ नागरिक अर्जुन निजाम कांबळे यांच्या 68 व्या वाढदिवसाचा आढावा अर्जुन कांबळे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचारी सुमारे चाळीस वर्षे आपल्या नोकरीत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोच पावती म्हणून त्यांना मिळालेले उत्कृष्ट कर्मचारी प्रमाण पत्र बरेच काही सांगून जातात नोकरी करत असताना ते गांधीनगर येथे एकवीस वर्षे सेवा करत असलेल्या निःस्वार्थ सेवेचे प्रमाणपत्र तसेच सरूड, ते शिये अश्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या प्रामाणिक पणे करत असलेल्या कामाची पोच पावती त्याना गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना प्रोत्साहन मिळत गेले, त्यापूर्वी अत्यंत गरिबीतून त्यांनी ही नोकरी करत आपला जीवनप्रवास सुरु केला एक सर्व सामान्य कुटुंबातील थोर व्यक्तिमत्व अर्जुन कांबळे वडिलांनकडून प्रेरणा मिळाली मोठं कुटुंब असल्याने सुरुवातीचे दिवस खूप खडतर होते त्यातून त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं त्यातूनच त्यांना तीन अपत्ये त्यांचे देखील संगोपन उत्कृष्ट पद्धतीने केले मुलगी वैशाली गावचे सरपंच पद भूषविले यांनी देखील आपल्या वडिलांपासून प्रेरणा मिळाली असं बोलत होत्या तसेच त्यांचे लहान चिरंजीव शीतल कांबळे व सुनबाई प्रिया यांनी देखील त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांनी शिकवलेल्या मार्गांवरून जात त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करत आहेत असं हरहुन्नरी असणारे व्यक्तिमत्व अर्जुन कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चिरंजीव शीतल कांबळे हे उत्कृष्ट पत्रकार म्हणून कार्यरत आहेत ही किमया अर्जुन कांबळे यांनी मुलांना चांगलं शिकवलेल्या कामाची पोच म्हणावी लागेल.