चोकाक येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली माजी उपसरपंच सविता हलसवडे यांच्या हस्ते फोटो पूजन व विद्यमान उपसरपंच हर्षदकुमार कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली यावेळी उपस्थितांची भाषणे झाली यावेळी उपास्थित सरपंच सुनील चोकाककर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात मांडला तसेच हर्षद कांबळे यांनी देखील आपल्या भाषणात पुरस्कार कर्त्यांचे कौतुक केले व खऱ्या अर्थाने या पुरस्काराच्या मानकरी असल्याचे त्यांनी आपल्या वक्त्याव्यात बोलले व त्यांना पुढील कार्यास सदिच्छा दिल्या तसेच ग्रामसेवक नीता बोदर्डे यांनी देखील शुभेच्छा दिल्या व कौतुक केले, जयंतीच्या अनुषंगाने अहिल्यादेवी होळकर पुरस्कार यावेळी देण्यात आले समाजात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या अंगणवाडी क्र151 च्या विद्या मनोहर चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना यंदाचा मानाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला दुसरा पुरस्कारअशासेविका सुवर्णा ननवरे यांनादेण्यात आला पुरस्कारासाठी दोन अर्ज आल्याने दोघीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दोघीनीही केलेल्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार जाहीर करण्यात आले पुरस्कार कर्त्या बोलताना म्हणाल्या या पुरस्काराने आम्हाला पुनः नव्याने काम करण्याचा उत्साह मिळाला व प्रेरणा मिळाली आम्ही करत असलेल्या निःस्वार्थ कामाची पोच पावती मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या यावेळी उपास्थित सरपंच सुनील चोकाककर, उपसरपंच हर्षदकुमार कांबळे, ग्रामसेविका नीता बोदार्डे, सदस्य महावीर पाटील, मा उपसरपंच सविता हलसवडे, ओपरेटर गायत्री कुंभार, क्लार्क गीतांजली कांबळे शिपाई युवराज नंदिवाले, अशा सेविका पूनम सुतार, नीलम चव्हाण, सुवर्णा ननवरे, विद्या चव्हाण, यांच्या सह महिला व गावातील नागरिक उपास्थित होते.