डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
जयसिंगपूर येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची न्यूमेट्री टेक्नॉलॉजी व ब्राईट इन्फोटेक या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी दिली.
कु. मयुरी तहसीलदार, रितेश पाटील, आशुतोष पाटील, आर्यन शिंदे, तुषार गिड्डे, प्रतीक जावळे, श्रेयस गायकवाड, अभिषेक मगदूम, पल्लवी पोवार व प्रथमेश शिंदे या विद्यार्थ्यांची न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज व ब्राईट इन्फोटेक या सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनिल आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
विभाग प्रमुख, विभागवार ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
Posted inBlog
डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
