
म
महाराष्ट्रातील 60 लाख नोंदीत बांधकाम कामगारांच्यावर अन्याय करणारे बेकायदेशीर जाचक दक्षता पथक रद्द करा. मागणीसाठी 9 जुलै रोजी राज्यात जोरदार आंदोलन !
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दक्षता पथक कामकाजामध्ये बांधकाम कामगारांना अपमानस्पद नोंदणी रद्द करणारच इतकेच नव्हे तर खऱ्याखुऱ्या बांधकाम कामगारांना बोगस कामगार समजून प्रश्न विचारणे गैर आहे .तसेच इतर कागदपत्रे जी मागता येणार नाहीत. त्याची मागणी करणे बेकायदेशीर आहे. म्हणूनच दक्षता पथक कामकाज त्वरित बंद करण्यात यावे त्याबाबत तक्रार अर्ज आजच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव ,महाराष्ट्राचे कामगार आयुक्त ,महाराष्ट्र कामगार विभागाचे सचिव यांना त्वरित निवेदन ईमेल द्वारे पाठवण्यात आले.
तारीख एक जुलै 2025 रोजी मा मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्ही जे निवेदन पाठवले होते ज्यामध्ये हे दक्षता पथक रद्द करावे अशी मागणी केलेली आहे ते निवेदन त्यांनी कामगार विभागाच्या सचिवांना पाठवून देऊन त्यांच्याकडे आम्ही चौकशी करावी असे सांगितलेले आहे.
त्यामुळे दक्षता पथकामार्फत बांधकाम कामगारांची जी अन्यायकारक अपमानास्पद चौकशी चालू आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
कारण बांधकाम कामगार कायदा कलम 12 नुसार जर बांधकाम कामगारांच्या अर्जामध्ये किंवा मंजूर अर्जामध्ये काही चुकीचे असल्यास अथवा बोगस असल्यास त्यांना लेखी नोटीस देऊन आणि कामगारास आपला बचाव करण्याची संधी देऊन चौकशी करावी लागते. ते न करता प्रत्यक्षात कार्ड रद्द करणे बाबत तरतूद कायद्यामध्ये नाही.
सर्वोच्च न्यायालयामार्फत कामगारानी ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही असा निकाल आहे. आणि तसा निर्णय राज्य शासनाने घ्यावा असे आदेश आहेत. त्यामुळे 90 दिवसाची तपासणी करण्याचा मंडळाचा निर्णय पूर्णपणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार आहे. इतकेच नव्हे तर कामगाराला नोटीस न देता त्याची तपासणी करणे हे पूर्णपणे कायद्याचे विरोधी आहे.
दक्षता पथका मार्फत कामगारांना असे विचारले जात आहे की सध्या तुम्ही कुठे काम करत आहात ती साईट दाखवा. हा प्रश्न विचारणे चुकीच आहे कारण ज्यावेळेस नोंदणी केली जाते त्याच्या पूर्वी 90 दिवस काम केल्याचा पुरावा लागतो. आज तो कामगार काम करीत आहे किंवा नाही याचा काही संबंध नाही.
त्यामुळे असा प्रश्न करून कामगारांना त्रास देणे हे ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे.
अन्यथा आम्हाला तपासणी करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकायुक्त आणि शासनाकडे गंभीरपणे तक्रार करावी लागेल असा निर्णय आज कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला
या महत्वपूर्ण बैठकीसाठी कॉ शंकर पुजारी, बाळासाहेब वसगडेकर कॉमेडी विशाल बडवे ,. विजय पाटील शुभांगी तोळे, प्रीती मुठेकर,ज्योती शिसाळे वैभव बडवे इत्यादी उपस्थित होते.
असे पत्रक कॉ शंकर पुजारी
राज्य निमंत्रक
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.