प्रबोधिनीत एन.डी. ना अभिवादन
इचलकरंजी ता.१५ समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष थोर विचारवंत कालवश प्रा. डॉ.एन. डी.पाटील यांच्या ९६ व्या जन्मदिनी समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या हस्ते प्रा. डॉ.एन.डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी ,कविता डांगरे, विशाल पाटील, रवींद्र जिरगे, चंद्रकांत बागडे, अनिल बावणे ,विजय मानकर, प्रमोद वासुदेव आदी उपस्थित होते.