डॉ.मगदूम अभियांत्रिकी मध्ये ‘ओबीई ‘ कार्यशाळा संपन्न
डॉ. जे. जे. कॉलेजमधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने’आऊट कम बेस्ड एज्युकेशन'(ओबीई) फ्रेमवर्क आणि अक्रिडेशन प्रोसेस या विषयावर तीन दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी प्रा. सत्यध्यान चिक्केरूर(केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हुबळी), डॉ. विनय कुलकर्णी (प्रोफेसर डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आकुर्डी,पुणे) व प्रा. मृणालिनी बुराडकर(सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी,नागपूर) हे प्रमुख मार्गदर्शक अभ्यागताना मार्गदर्शन करण्यासाठी लाभले.
डॉ. चिक्केरुर यांनी परिणाम आधारित शिक्षणाच्या प्रमुख पैलूवर लक्ष केंद्रित केले तर डॉ. कुलकर्णी व प्रा. बुराडकर यांनी अभ्यासक्रमाच्या निकालांची रचना आणि करावयांच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित केले.
आजच्या बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक जगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधिक वाढली आहे. या गरजांची पूर्तता करण्यासाठी Outcome Based Education (OBE) ही संकल्पना विकसित झाली आहे. OBE मध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये या सर्व बाबींचा विचार केला जातो. OBE प्रणाली अंतर्गत शिक्षण घेतलेले विद्यार्थी अधिक स्वतंत्र विचार करणारे, समस्यांवर उपाय शोधणारे आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार बनतात. त्यामुळे OBE ही केवळ शैक्षणिक नव्हे तर एक सर्वांगीण विकास करणारी प्रणाली आहे.
तथापि त्याचे सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणे गरजेचे आहे,त्याच साठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते अशी माहिती डीन डॉ. पी. पी. बेळगली यांनी दिली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम,एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी. पी. बेळगली यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला.
