समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्यिकांचे आहे – प्रा. राजा माळगी
बेडकिहाळ येथे 20 जुलै रोजी कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 5 वे, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 20 रोजी देशभक्त रत्नाप्पाना कुंभार सभागृह, बी.एस.कंपोजिट ज्युनिअर कॉलेज बेडकिहाळ येथे हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा. डॉ बाबासाहेब चिकणे, यशस्वी उद्योजक पुणे,
यांच्या हस्ते हार घालून करन्यात आला. तेथुन ग्रंथ व पालखी पुजणाला सुरुवात झाली. ग्रंथ व पालखी पुजण
मा. दत्तात्रय पाटील.उधोजक, सौ.डॉ.सुमित्रा पाटील उधोजिका कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. तेथुन साहित्य नगरी पर्यंत ग्रंथदिंडी पालखी बेडकिहाळ व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अरण्यॠषी स्व.मारुती चितमपल्ली
प्रवेशद्वार उद्घाटन डॉ दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वशंज नायगाव
यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ जयंत नारळीकर साहित्य नगरी उद्घाटन डॉ अनंत शिंगाडे उधोजक पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. स्व.मा.आम.काकासाहेब पाटील व्यासपीठ उद्घाटन तात्यासाहेब खोत चेअरमन बी एस कंपोजिट कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन मा.सुभाष होसकल्ले निर्वुत जिल्हा न्यायाधीश बेळगावी
तसेच. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
भगवाण गौतम बुद्ध प्रतिमा पुजण मा.डॉ. नितीन गोंधळी
यांच्या हस्ते, भगवाण महावीर प्रतिमेचे पूजन डॉ प्रकाश कदम महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन मा.बाबण्णा खोत. अध्यक्ष, जय जिनेंद्र सौहार्द शमनेवाडी, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पुजण मा.प्रा.डॉ मारुती पाटील, छ.शिवाजी महाराज प्रतिमा पुजण मा. प्रा डॉ पांडुरंग पाटील, राजर्षी छ. शाहू महाराज प्रतिमा पुजण मा.बाळासाहेब शिंदे संचालक, ज्योती सौहार्द,एक्संबा,
म.ज्योतिबा फुले प्रा.डॉ गोपाल महामुणी, मराठी विभाग प्रमुख श्री.कुसमावती मिर्जी महा. बेडकिहाळ, सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजण डॉ दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वशंज नायगाव,
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पुजण दादासाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते बेडकिहाळ,
साहित्यिक आण्णाभाऊ साठे प्रतिमा पुजण मा.वि.गो वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकिहाळ या मान्यवरांच्या शुभहस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर स्वागत कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले. तर प्रास्ताविक मा.प्रा.प्रकाश कदम कोगनोळी यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केला.
उद्दघाटक.सुभाष बी होसकल्ले निर्वुत जिल्हा जिल्हा न्यायाधीश बेळगावी म्हणाले की साहित्य माणसाला समृद्ध बनवते. साहित्याच्या वाचनाने व्यक्तीचे भावविश्व समद्ध बनते.साहित्य माणसाला जगणे शिकवते.मराठी कन्नड यातील बांधव टिकून राहिले पाहिजे. दोन्ही भाषांमधील साहित्य सम्रुध्द असुन हे साहित्य रसिकांनी वाचले पाहिजे. मराठी आणि कन्नड या भाषांमध्ये प्राचीन काळापासून देवाण घेवाण सुरू असुन आजही त्यामध्ये खंड पडलेला नाही. या दोन्ही भाषांमधील साहित्यिकांनी हे बांधव्य, भाषांदरम्यानची देवाणघेवाण अबाधित राखले पाहिजे. असे ते म्हणाले. तसेच राजेंद्र वड्डर, माजी जिल्हा पं सदस्य गळतगा, म्हणाले की आधुनिक युगात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे एवढे सोपे नाही. पण डॉ. विक्रम शिंगाडे यांनी आजच्या युवा पिढीला साहित्याची जाणीव व्हावी. म्हणून या मोठ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले. डॉ.विक्रम शिंगाडे सारखे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ता प्रत्येक गावा गावात असला पाहिजे. तसेच आज भाषा बांधव्य प्रत्येकाने जपले पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा राजा माळगी. मराठी विभाग प्रमुख, कवी, लेखक, समीक्षक, ख्यातनाम वक्ते, संत साहित्याचे विवेकी चिकित्सक, इस्लामपूर म्हणाले की भारतात विध्वंस घडविण्यासाठी शत्रू राष्ट्राला भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही. भारतावरील अणुबॉम्बचा हल्ला परतवण्यासाठी भारत सक्षम आहे. पण यापुर्वीच भारतावर अप्रत्यक्षपणे आक्रमण करन्यात आलेले आहेत.विविध माध्यमांच्याद्वारे केलेली ही आक्रमणे नव्या पिढीला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहेत. भारताची युवा पिढी बिघडवण्याचे कार्य ही आक्रमणे करीत आहेत. त्यामुळे ही आक्रमणे परतवुन लावण्याचे सामर्थ्य साहित्यिकांमध्ये असून साहित्यिकांनी या विरुद्ध लेखणी वापरायला हवी. असे ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा डॉ पांडुरंग पाटील प्रसिद्ध वक्ते गडहिंग्लज हे लाभले होते. ते म्हणाले की आधुनिक युगात जगताना आपण कसे जगतो ते फार महत्त्वाचे बनत चालले आहे. कन्नड व मराठी कोणतीही भाषा असुदे भाषेवर आपले प्रेम असले पाहिजे असे ते म्हणाले.
तसेच मा.प्रा डॉ विराट गिरी डायरेक्टर, संजय घोडावत इन्स्टिंट्यूट कोल्हापूर, ते म्हणाले की युवावर्गाने नवनवीन साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आजच्या युगात तंत्रज्ञान बदलत चालली आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात. शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे माणुस घडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणुन घेऊन बदलते तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल केले पाहिजे. बदलते तंत्रज्ञान व आजचे शिक्षण
या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.
तिसऱ्या सत्रात बेडकिहाळ येथील महिला सफाई कामगारांना साड्या वाटप करण्यात आले.
तर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर मराठी व हिंदी संगीताचा बहारदार कार्यक्रम स्वरतरंग संगीत अकॅडमी इचलकरंजी, संस्थापक अध्यक्ष श्रीपती कोरे व सौ शुभांगी कोरे यांचा बहारदार संगीतचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास राजयोगिनी ब्रम्हाकुमारी मनिषा दीदी क्रुषीतंज्ञ शिरोळ सेवाकेंद्र प्रमुख, प्रा. वि.गो.वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकिहाळ, प्रा. डॉ.गोपाल महामुणी मराठी विभाग प्रमुख श्रीमती कु.मिर्जी महा. बेडकिहाळ, डॉ दिलीप कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक कुंरदवाड, प्रकाश धनगर ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ, उदय पांगिरे ज्येष्ठ पत्रकार बेडकिहाळ, अशोक आरगे संचालक पी के पी एस बेडकिहाळ, मलगौडा पाटील, बाबु नारे चेअरमन शिवनेरी सौहार्द बॅंक, बेडकिहाळ, महावीर पाटील, दादासाहेब पाटील, मोहण मालवणकर, शितल खोत, तात्यासाहेब केस्ते, आण्णासाहेब पाटील, सुभाष पाटील, वैभव कांबळे, तुषार कांबळे, बाबासाहेब घोटणे, ॲड निरंजन कांबळे, ज्योती आदाटे, महादेव नाईक, वसंत बाबर, सुधाकर माने, आण्णासाहेब नलवडे , अनेक संघ संघटना व संस्थेचे पदाधिकारी, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, तसेच बेडकिहाळ व परिसरातील साहित्य प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲड.प्रिती हट्टीमणी यांनी केले.