‘साहित्य रंग’ भाग – १६, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेवर एक दर्जेदार साहित्यिक पर्व
मुंबई, दि. २४ जुलै २०२५ : मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा सोळावा भाग २५ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डिजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
साहित्यप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. या भागात लेखिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी व कवी समीर सामंत आपले साहित्यिक विचार, कविता आणि रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार असून, नेहमीप्रमाणे रसिकांशी संवाद साधणारी ही मालिका साहित्यप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचा आणि नव्या लेखक-कवींसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा उत्तम नमुना आहे.
रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल-
लिंक :