डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या ३२ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व ई.टी.सी. विभागातील एकूण ३२ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर कनेक्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी दिली.
क्यूस्पायडर ही एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये काम करणारी कंपनी असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ०३लाख हून अधिक पॅकेज देऊ केले आहे.
अनुराग कुरणे, महावीर मगदूम, तनुश्री शिंदे, प्रणव शिखरखाने, ऋषिकेश घोडके, आकांक्षा गायकवाड, सानिका मोहिते, दिपाली झिटे, शर्वरी कुलकर्णी, प्रथमेश गोडसे, वृषाली माळी, वैष्णवी चव्हाण, रणजीत पाटील, निकिता धोंड, श्रावणी पट्टणशेट्टी, आर्यन पाटील, तेजस रंगत, वैभव चव्हाण, ओमकार तिबिले, दक्षा निकम, रोहन सावंत, प्रथमेश राऊत, प्रज्ञा वासुदेव, सलोनी देसाई, सानिका पाटील, श्रेयश देशमाने, भारत कुंडेकर, साक्षी कोळेकर, अंतरी इंदलकर, अभिषेक मगदूम, सुयोग मोहिते, अथर्व दिवटे या विद्यार्थ्यांचे नोकरीसाठी निवड झाली आहे.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये १५० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी झाले आहे. संस्थेस मिळालेला ऍटोनॉमस( स्वायत्त) दर्जा व एन.इ.पी. २०२० अंतर्गत शिवाजी विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रमाचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना होईल अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सौरभ खानावळे यांनी दिली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे सहकार्य लाभले.