प
मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक किहोल शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी
सिद्धगिरी न्युरो विभागाचा अनोखा विक्रम
येथे प्रख्यात न्युरोसर्जन डॉ .शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमकडून यशस्वी वाटचाल.
(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
मेंदूच्या शस्त्रकीया ह्या अत्यंत जटील व नाजूक असतात. अशा शस्त्रकीयांमध्ये रुग्णाच्या जीविताला अधिक धोका असतो त्यामुळे शस्त्रकीया अत्यंत जोखमीच्या असतात. मेंदूच्या शस्त्रक्रिया क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षात अमुलाग्र बदल होते गेले आहेत. आज मेंदूच्या जटील अशा शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने उल्ल्खेनीय कार्य केले आहे. याच शृंखलेत मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया करून पुनः एकदा अनोखा विक्रम सिद्धगिरी हॉस्पिटलने केला आहे.” अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के* यांनी पत्रकार परिषेदेत सांगितली.
यावेळी ते पुढे म्हणाले, पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे.
आपण नेहमी विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो, पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील मोजक्याच्या ठिकाणी सर्व उपकरणांसह केली जाते, अन्यथा इतर ठिकाणी हि उपकरणे नसल्यामुळे रुग्णांना गंभीर व कायमची हानी होऊ शकते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल ५०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.
मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो, त्यामुळे मेंदूच्या विकारांवर योग्य वेळी योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. इतर अवयवांच्या शस्त्रक्रियांच्यासाठी एंडोस्कोपि वापरण्यात येते, पण जे अवयावांच्यात पोकळी आहे तिथे एंडोस्कोपचा वापर करण्यात येतो, मेंदू हा पूर्णपणे भरीव असल्यामुळे अशा ठिकाणी एंडोस्कोपिचा वापर अतिशय कुशलतेने करावा लागतो. अशी कुशल टीम सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे कार्यरत असल्यामुळे मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक रूग्णांच्यावर इंदोस्कोपिक कि-होल सर्जरी येथे यशस्वी करण्यात आलेल्या आहेत. मेंदूच्या भागात मेंदूच्या कार्यासाठी बाजूला जे पाणी असते ते पाणी सतत तयार होत असते व ते प्रवाहित हि होत असते. पण हे प्रवाह करणाऱ्या ट्यूब जर ब्लॉक झाल्या तर ह्या पाण्याचे प्रमाण वाढून मेंदूवर दाब येण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी पारंपरिक उपचार पद्धतीत लोक या ठिकाणी शस्त्रक्रिया करून ब्लॉक झालेली ट्यूबला नवीन पाईप जोडून ती पोटात सोडली जाते, या उपचार पद्धतीत संसर्ग (इन्फेक्शन) होणे किंवा ट्यूब पुन्हा ब्लॉक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वेळी एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया वरदान ठरू शकते. याशिवाय या इंडोस्कोपिक सर्जरी मुळे मेंदूच्या मुख्यभागातील ट्युमर काढणे, गाठी काढणे यासह बायप्सी करीता हि अत्यंत उपयोग होतो. मायक्रोस्कोपचा वापर करून अनेक मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात, पण अनेक वेळा मायक्रोस्कोपचा वापर केवळ वरून करता येतो, शस्त्रक्रिया करताना मध्ये येणाऱ्या अवयवांच्या आजूबाजूला अथवा खाली मायक्रोस्कोपवापरता येत नाही, अशावेळी त्या अवयवांच्या आजूबाजूला व खालील भागात एंडोस्कोप अत्यंत उपयोगी पडते. पुणे,मुंबई व बंगलोर या मेट्रो सिटी नंतर असा मेंदूशस्त्रक्रिये करिता अत्याधुनिक इंडोस्कोप केवळ सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे जागतिक दर्जाचा जर्मनी येथील Storz Lotta कंपनीचा इंडोस्कोप सन २०१७ पासून कार्यान्वित आहे. अत्यंत सूक्ष्म अशा ७ मिलीमीटर पेक्षा कमी जागेत वापर असल्यामुळे एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रियेमुळे कमीतकमी चिरफाड करून शस्त्रक्रिया करता येते. तसेच असे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये हि कमी दिवसात हे उपचार घेता येतात शिवाय त्यांची रिकव्हरी हि अत्यंत वेगाने होते. पारंपरिक उपचार पद्धतीत ज्या शंट (पाईप) टाकून शस्त्रकीया केल्या जातात काही कालावधी नंतर त्यात अधिक धोक अथवा अडथळे तयार होतात पण एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये हे धोक नसतात, त्यामुळे दीर्घकाळ रुग्णास अशा स्वरूपाचा त्रास पुन्हा होत नाही. तसेच एंडोस्कोपिक पिट्यूटरी शस्त्रक्रिया यामध्ये एन्डोस्कोपचा उपयोग अतिशय महत्वपूर्ण होतो. याशिवाय नाकाच्या वरील व मेंदूच्या खालील भागात काही गाठी असतील अथवा ट्युमर असतील तर ते काढण्यासाठी स्कल बेस एंडोस्कोपिक शास्त्रक्रीयामाध्ये एंडोस्कोपचा वापर केला जातो.
यावेळी बोलताना डॉ. प्रकाश भरमगौडर म्हणाले, “अशा प्रकारे आधुनिक उपकरणे वापरून व असा अद्यावत इंडोस्कोप वापरून कि-होल सर्जरी अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. मायक्रोस्कोप तंत्रज्ञान, न्युरो नेव्हीगेशन मशीन, न्युरो मॉनेटरिंग प्रणाली सह अनुभवी न्युरो शस्त्रक्रिया तज्ञ, अनुभवी न्युरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशी एंडोस्कोपिक कि-होल शस्त्रक्रिया यशस्वी होवू शकते.अशा शस्त्रक्रियांच्यासाठी इतर रुग्णालयात सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्च होतो तर आपल्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये केवळ १ लाख रुपये इतक्या नाममात्र खर्चात होणार आहे. तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.”
यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक व आभार विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, विवेक सिद्ध, राजेंद्र शिंदे, पंकज पाटील, कुमार चव्हाण, अजय कांबळे व पत्रकार उपस्थित होते.