उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन
पुणे दिनांक २८ जुलै: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात येऊन नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते आणि पत्रकार दीपक टिळक यांचा मुलगा रोहित टिळक, मुलगी गीताली टिळक अन्य कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दीपक टिळक यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, नाना भानगिरे आणि शहर संघटक आनंद गोयल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
दीपक टिळक हे ‘केसरी’ वृत्तपत्राचे संपादक होते आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घराण्याचे वंशज होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी एक मोठी हानी मानली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीमुळे टिळक कुटुंबियांना मोठा आधार मिळाल्याचे बोलले जात आहे.