नो साऊंड – नो लेझर:पिंटू मगदूम फार्मसीचा स्तुत्य उपक्रम
अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्तीच्या वतीने ध्वनी प्रदूषण व लेझर प्रदूषण या संदर्भात सामाजिक जाणीववेतून जनजागृती रॅली अभियान राबवण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जयसिंगपूर शहरात रॅली काढली.
‘ नो साऊंड नो लेझर ‘ अशा पद्धतीचे फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होते. येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक सण साजरे करतेवेळी सामान्य, आजारी असणाऱ्या नागरिकांना ध्वनी व लेझर प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांच्या सामाजिक जाणीवेतून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कु. मानसी झाडे यांनी हा उपक्रम पार पाडला.
महाविद्यालयातील अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
Posted inकोल्हापूर
नो साऊंड – नो लेझर:पिंटू मगदूम फार्मसीचा स्तुत्य उपक्रम
