सिद्धार्थ नगर दंगलीचा मुख्य सुत्रधार शोधा – बौद्ध समाजाचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर : सिद्धार्थनगरमध्ये बौद्ध समाज व राजेबागस्वार मुस्लीम गटात तेढ निर्माण झाली असून शुक्रवारी रात्री याचे रूपांतर दंगलीत झाले. त्यामुळे दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली. सध्या कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दंगल च्या मुख्य सुत्रधाराचा पोलिसांनी शोध घेवून दंगल घडवणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापुर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे . दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालय येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . सिध्दार्थ नगर रजनीकांत सरनाईक, सुशीलकुमार कोल्हटकर, स्वप्निल पन्हाळकर, मंगेश कांबळे स्वाती काळे मल्हार शिर्के,एस पी कांबळे,इ.उत्तम कांबळे RPI A , सुभाष देसाई ब्लँक पॅंन्थर पक्ष,डी जी भास्कर, नगरसेवक जय पटकारे, मुस्लिम समाज..अदिल फरास,कादर मलबारी, रियाज सुभेदार नगर सेवक, भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष,जाफर बाबा,राजेबाग स्वार दर्गा येथील कार्यकर्ते हजर होते .
सिद्धार्थनगर बौद्ध स्वागत कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावल्यावरून हा वाद सुरू झाला. यामुळे शुक्रवार दुपारपासूनच या परिसरात तणाव निर्माण झाला होता. या परिसरात बौद्ध समाजाच्या स्वागत कमानी शेजारी बौद्ध समाजातील महिला, युवती युवक व एकुनच बौद्ध समाजातील नागरीकांची ये – जा होत असते . या ठिकाणी राजेबागस्वार हा मुस्लीम गट राहतो तो नेहमी बौद्ध समाजाला त्रास होईल असे कृत्य करीत असतो . शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता हा वाद उफाळून आला. त्यानंतर मुस्लीम गटातील नागरिकांनी बौद्ध समाजावर तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. तसेच काही तरुणांनी परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांची देखील तोडफोड केली. काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परिसरात बॅनर लावण्यावरून हा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून ते बॅनर उतरवले आहे. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक मागवून जमावावर नियंत्रण मिळवले आहे. या प्रकरणी दंगल घडवणाऱ्या घटकांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .