आदिवासी समाज गाव भेट दौरा-पाचपोर (पार्डी) येथे समस्यांचा आढावा
सुनील शिरपुरे/यवतमाळ
झरीजामणी: तालुक्यातील पाचपोर (पार्डी) गावात पवन कुळसंगे मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने आदिवासी समाज गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला. या दौ-यात समाजातील अनेक मान्यवर व युवक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून गावक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी, शासकीय योजनांची अंमलबजावणी, रोजगार, शिक्षण, रस्ते व मूलभूत सोयीसुविधा यासंबंधीच्या समस्या मांडल्या. पवन कुळसंगे मित्रपरिवाराने समाजातील प्रत्येक आवाज ऐकून घेतला आणि शासन दरबारी या प्रश्नांचा पाठपुरावा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या दौ-यामुळे गावातील तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढला असून एकतेची भावना अधिक दृढ झाली. शिवाय या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील समस्या मांडण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमात किशोर टेकाम, प्रशांत निमसरकर, नितेश टेकाम, बापूराव टेकाम, लक्ष्मण आत्राम तसेच घट्या, नाईक, महाजन, कारभारी यांसारखे अनेक समाजबांधव उपस्थित होते.