पाली भाषा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कोल्हापुर : बुद्धविहार समन्वय समिती जिल्हा शाखेच्या वतीने पाली भाषा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ हुपरी येथील बुद्ध विहार प्रतिष्ठान येथे संपन्न झाला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. प्रमोद हुपरीकर होते. सुरुवातीला त्रिसरण पंचशील आयु.सुधाकर कांबळे व नानासो कांबळे(हुपरी)यांनी घेतले. प्रबुद्ध अभ्यासिका सरनोबतवाडीच्या विद्यार्थीनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे गायन पाली भाषेतुन केले. प्रमुख पाहुणे आयु. वसंत खांडेकर सर यांनी पाली भाषा परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. जर बौद्ध धम्म सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवायचा असेल तर पाली भाषा गरजेची आहे, त्यासाठी पाली भाषा सहज समजून घेण्यासाठी ह्या परीक्षा महत्वाच्या असल्याच्या त्यांनी सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु प्रमोद हुपरीकर यांनी सर्व यशस्वी परीक्षार्थींचे अभिनंदन केले व जनतेमध्ये धम्म रुजवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. .यावेळी मान्यवरांच यश हस्ते यशस्वी विध्यार्थ्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले ..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हूपरीतील अनेक जेष्ठ कार्यकर्त्यानी योगदान दिले, सुधाकर कांबळे, मोहन कांबळे(टेलर)दिलीप शिंगाडे, मोहन शिंगाडे, सागर कांबळे इत्यादीनी सहकार्य केले.
प्रास्ताविक आयु. आनंदा कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचलन आयु दिलीप शिंगाडे यांनी केले यावेळी धम्म चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते*