मद्य वाहनासह पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त
एक्साईज कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची कारवाई
अमोल कुरणे
कोल्हापूर, दि.२६ (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने पडवळवाडी येथे गोवा बनावटीची अवैध विदेशी मद्य वाहन छापा टाकून जप्त केले.
एक्साईज कोल्हापूर विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने कंटेनर ट्रक क्र. एम एच १२ व्ही टी ७४०३ या वाहनामध्ये गोवा विक्रीकरीता असलेले ६७, २०० विदेशी मच रॉयल ब्ल्यू व्हिस्की १८० मि.ली.चे एकूण १४०० बॉक्स जप्त केले. मद्य व मुद्देमालाची किंमत वाहनासह १, ७७,८४, ooo असून आरोपी शैलेश जयवंत जाधव, व.व. ३६, रा. २०७, कचरे गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली व आरोपी वासुदेव केशवराव मुंढे, व.व. ४२ रा. १०३ विठ्ठलवाडी, ता. हवेली, जि. पुणे, फ्लॅट नं. २०२, श्रोतेज निवास, आदित्य ग्रीन सोसायटी जवळ, पुणे यांना अटक करून गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, कॉन्स्टेबल मारूती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे यांनी केली.