गुणवंत शिक्षिका अलका खोचरे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
167 विद्यार्थ्यांना दत्तक घेणाऱी अनाथांची माऊली- डॉ अलका खोचरे
एशियन वेदिक कल्चरल रिसर्च चेन्नई युनिव्हर्सिटी यांच्या वतीने अलका खोचरे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करुन सन्मानपत्र स्मृतिचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
अलका खोचरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अनेक गोर गरीब गरजु लोकांना मदत करत असतात. अनेक अनाथ आश्रमांना, भेट देऊन त्यांच्यासाठी अन्नधान्य, कपडे, वह्या, पुस्तके, शालेय साहित्य वाटप करत असतात.गोरगरीब व निराधार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अभ्यास साहित्य पुरवुन स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली. सुरवातीला केवल 80 विद्यार्थ्यांचा पट असणारी शाळा आज 1300 हुन अधिक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. गरजु विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सायकल वाटप केले आहेत. वाटप 167 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या विवाहापर्यंतची जबाबदारी त्यांनी पार पाडत आहेत. यामधील अनेक विद्यार्थींनी नोकरी व व्यवसाय करीत आहेत. तर काही विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी बनुन देशाची सेवा करीत आहेत. अलका खोचरे या स्वतः खो खो आणि कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. प्रजासत्ताकदिनी राजाराम मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये 1,000 हुन अधिक विद्यार्थी सहभागी होतात. अध्यापनाव्यतिरिक्त सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक खेळ या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. तसेच नृसिंहवाडी येथे बालकांवर बालसंस्कारचे कार्य त्या गेली अनेक वर्षांपासून करीत आहेत. 40 हुन अधिक वेळा त्यांनी रक्तदान केले आहेत.
तसेच सर्वात मोठा उपक्रम म्हणजे त्या प्राथमिक शिक्षिका झाल्यापासून ते आतापर्यंतचा त्यांचा पगार त्यांनी एकही रुपया घरी न वापरता त्यांनी सर्व पगार अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरत आहेत. असे कार्य फक्त आणि फक्त अलका खोचरे याच करीत आहेत.
तसेच त्या उत्तम लेखिका व वाचक असुन त्यांचे स्वतःचे ग्रंथालय आहे. त्यांनी लिहिलेल्या गाव या एकांकिकेस अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खोचरे यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य हे सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना 100 हुन अधिक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. त्यावेळी डॉ के.ए.मनोहरम एक्स एम.एल.ए, नॅशनल जनरल सेक्रेटरी तमिळनाडू, डॉ. श्रीनाथ कराटे नॅशनल इंटरनॅशनल कराटे कोच चेन्नई, डॉ गुणवंत मंजु कन्नड फिल्म डायरेक्टर बेंगळुरू, जी.एन.गोवर्धनस्वामी जपान मार्केट आय.टी.डिलेव्हरी लिडर,टोकियो आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम दि. 30 रोजी फोरचुन हॉटेल,होसुर तमिळनाडू येथे उत्साहात पार पडला.