बांधकाम कामगारांचे सर्व मंजूर थकित अर्जांचे त्वरित लाभ द्या. यासह इतर मागण्यांच्यासाठी सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दुपारी बारा वाजता सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की सध्या हजारो अर्ज मागील एक वर्षापासून मंजूर असून सुद्धा त्यांना योजनेचे लाभ मिळत नाहीत. हजारो अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत ते अर्ज तपासले जात नाहीत. म्हणून त्वरित सर्व प्रलंबित अर्ज निकाली करावेत अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात बोलताना सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांनी सांगितले की सध्या शासनाने एक रुपये घेण्याचे बंद करून मोफत अर्ज मंजूर करण्यात ठरवलेले आहे परंतु त्याबाबतच्या सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक दुरुस्ती अद्याप पूर्ण झालेली नाही ती आठ दिवसांमध्ये होऊन सर्वांना नोंदणीचे क्रमांक मिळतील असे सांगितले.
ज्या लाभार्थीने 60 हजार रुपये किंवा एक लाखाचे स्कॉलरशिप लाभ घेतलेले आहेत त्यांची तपासणी सध्या चालू आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असल्याबद्दल कॉलेज मार्फत खात्री केल्यानंतरच अर्ज मंजूर होतील असे सांगितले.
परंतु ज्यांची शिष्यवृत्तीची मागणी 60 हजार किंवा एक लाखची नाही त्यापेक्षा कमी आहे त्यांच्या तपासणीची स्वतंत्र मंजुरीची पर्याय व्यवस्था करणे आवश्यक आहे.शालेय विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आल्याची श्री मुजावर यांनी सांगितले.
शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले की लाभ मिळण्यासाठी अनेक आवश्यक अर्ज प्रतिज्ञापत्रसाठी पाचशे रुपये ची स्टॅम्प पेपर मागणी केली जाते. उदाहरणार्थ घर मागणी अर्ज, विवाहाचा अर्ज . परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे स्टॅम्प देण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. याबाबत श्री मुजावर यांनी सांगितले की त्यांनी स्वतःच महाराष्ट्र शासनाकडे व मंडळाकडे मागणी केलेली आहे की शासनाच्या निर्णयानुसार प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपर घेण्याचे बंद करावे. याबाबत त्यांनाही अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही.
काही योजना बंद असल्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये गंभीर आजाराचे अर्ज मृत्यूचा लाभ इत्यादी ऑनलाइन स्वीकारले जात नाहीत.
याबाबत त्यानी असे सांगितले की नुकतेच तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत देण्याचे मंडळांनी बंद केलेले आहेत. आज महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व मोफत उपचार मिळतात तसेच लाभ बांधकाम कामगारांना मिळतील असे जाहीर केलेले आहे.
शिष्ट मंडळामध्ये कॉ शंकर पुजारी, कॉ विशाल बडवे, श्रुती नाईक ,इमरान बंग,शाबिदा शेरकर ,अब्दुल हमीद व सुभाष साळी इत्यादींचा समावेश होता.
Posted inBlog
बांधकाम कामगारांचे सर्व मंजूर थकित अर्जांचे त्वरित लाभ द्या. यासह इतर मागण्यांच्यासाठी सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिले निवेदन
